॥ श्रीगुरु वासुदेव यंत्र ॥
'नमो गुरवे वासुदेवाय' १०१ कोटी नामजप संकल्प
प.पू.श्री सद्गुरुंच्या कृपेने १०१ कोटी 'नमो गुरवे वासुदेवाय' नामजप दि.२१ जून २०१४ रोजी पूर्ण झाला आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीमद्‍ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने दिनांक २७ डिसेंबर २०१२ रोजी, श्रीदत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजी यांनी श्रीगुरु वासुदेव यंत्राचे विमोचन केले. मंत्रसाधनेला यंत्रसाधनेची जोड दिली तर त्यातून निर्माण होणारी प्रचंड आध्यात्मिक शक्ती साधकाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या किंबहुना संपूर्ण विश्वाच्या शाश्वत कल्याणासाठी उपयुक्त ठरेल या भव्य हेतूने श्री गुरुजींनी हे यंत्र सर्व साधकांना उपलब्ध करून दिले आहे.
पुढे वाचा...
 
यज्ञ एक वरदान Print E-mail

Yadnyaयज्ञ ही एक सर्वश्रेष्ठ सामूहिक साधना आहे. सद्हेतूने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ होय व प्रकाश म्हणजे गती होय. यज्ञामध्ये प्रज्वलित केलेल्या पवित्र अग्निच्या प्रकाशावरील एकाग्रतेसहित केलेल्या सामुदायिक मंत्र पठणाने मंत्रशक्तिचा प्रचंड गुणाकार होतो व त्याचा लाभ स्वशक्तिपुनर्मेळ (Bio-feedback) पद्धतीने व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांना होतो.वैदिक यज्ञ हा आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांतांद्वारे श्रीगुरुजींनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी सामाजिक सहभागासहित सुरू केला आहे. यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, हरिहर यज्ञ,पितृयज्ञ, नर्मदा स्वाहाकार,गंगालहरी स्वाहाकार,गीता यज्ञ,शक्ती स्वाहाकार इ.चा समावेश आहे.

पुढे वाचा...
 
यज्ञ परिचय
"आमंत्रण सर्वांना, आग्रह कोणालाही नाही." सर्व जातींचे-पंथांचे-धर्मांचे स्त्री, पुरुष, कोणत्याही व्यक्तीला या यज्ञ कार्यक्रमात सहभागी होण्याची व मंत्र पठण-हवन करण्याची मुभा आहे; कारण प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा खराखुरा उद्धार करवून घेण्याचा हक्क निसर्गाने दिला आहे.

-परमपूज्य सद्गुरू श्री.बापट गुरुजी

 

  अनुक्रमणिका

• मुखपृष्ठ
चारधाम यात्रा छायाचित्रे
चारधाम यात्रा वृतांत
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्‍गुरुतीर्थ यात्रा
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१४
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०१३
यज्ञ कार्यक्रम वृत्त: २०११-२०१२
यज्ञ कार्यक्रम वृत्त:२०१०
यज्ञ कार्यक्रम वृत्त-२००९
विविध लेख (दैनिक सामना)
विविध लेख (संतकृपा मासिक)
विविध लेख (श्रीगुरुसेवा त्रैमासिक)
विविध लेख (सज्जनगड मासिक)
लेख (अक्कलकोट स्वामीदर्शन)
छायाचित्र दालने
• छायाचित्रे (पुष्कर यात्रा)
सामाजिक उपक्रम
माध्यम प्रसिद्धी
स्तोत्रे
१०१ कोटी नामजप संकल्प
प्रकाशित साहित्य
संपर्क साधा

  विशेष कार्यक्रम

तीन दिवसीय "शक्ती स्वाहाकार क्र.२" सप्तश्रुंगगड, वणी जि. नाशिक येथे दि. १५,१६ व १७ फेब्रु.२०११ रोजी आयोजीत केला आहे.
श्री.गुरुचरित्र सप्ताह वाचन कार्यक्रम दि.२/२/१२ ते ८/२/१२ या काळात खोपोली येथे संपन्न होणार आहे.
श्रीसद्गुरुंचे विवेचन :
• दि.५ फेब्रु.(सा.५.३०-६.३०), व
• दि.८ फेब्रु.(रात्री ८ नंतर) होईल.
इतर तपशीलासाठी क्लिक करा...
दिनांक ५ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०११ दरम्यान श्रीनर्मदा परिक्रमेअंतर्गत सदगुरुंच्या मार्गदर्शनाखाली ३२० भक्तांना घेऊन बारा यज्ञ, नर्मदापूजन, कुमारीकापूजन, दीपदान, पालखी सोहळा, नामस्मरण, दत्तजयंती, इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. प.पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी यांचा विवेचनाचा कार्यक्रम दि.२९ मार्च २०१३ रोजी सायं.५ वा. श्री सद्गुरु रामानंद बीडकर महाराज शताब्दी पुण्यतिथी कार्यक्रमात "श्री सद्गुरु रामानंद बीडकर महाराज मठ, २४५, शनिवार पेठ, पुणे-३०." येथे संपन्न झाला. * दि.२५,२६ व २७ ऑगस्ट २०१३ रोज़ी खोपोली स्थानावर निवासी सत्संग शिबिर आयोजित केले आहे. दि. २५ ऑगस्टला १०८ सत्यदत्तपूजा, स्वामी महाराज व भाऊ महाराज जयंती उत्सव होईल. तीनही दिवशी प.पू.सद्गुरू 'नवरत्नमाला स्तोत्र' यावर विवेचने करणार आहेत.
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे

*दिनांक २२ जून २०१४ रोजी बदलापूर येथील यज्ञ सोहळ्यात प.पू. श्री. गुरुजींनी "(A)ghorakashtoddhranana Stotra : The entire Substance and Interpretation" या इंग्रजीतील ग्रंथाचे विमोचन केले.
*दिनांक ८ जून २०१४ रोजी बदलापूर येथील यज्ञ सोहळ्यात प पू स्वामी विराजानंद विरचित "Shri Vasudev Yati" या इंग्रजी ग्रंथाचे विमोचन प.पू. श्री. गुरुजींनी केले.

*प.पू. श्री गुरुजींनी 'श्रीदत्तात्रेयस्तोत्र' आणि 'करुणात्रिपदी' या ग्रंथांच्या दुसर्‍या आव्रुत्तींचे प्रकाशन अनुक्रमे दि.२७ फेब्रु. व दि. ९ मार्च २०१४ च्या यज्ञ कार्यक्रमात केले.
* दि.९ फेब्रुवारी २०१४ रोजी बदलापूर येथील यज्ञ सोहळ्यात प.पू. श्री. गुरुजींनी "विचारें मना तूंचि शोधूनि पाहें"या ग्रंथाचे प्रकाशन केले.
*दि.९ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या सामुहिक रक्तदान शिबिरात १०१ साधकांनी रक्तदान केले.

* साडेतीन शक्ती पीठांवरील शक्ती स्वाहाकार मालिकेतील शेवटचा स्वाहाकार श्री क्षेत्र तुळजापूर येथे दि. १८,१९ व २० जानेवारी २०१४ला संपन्न झाला.
* दि.२५, २६ व २७ ऑगस्ट २०१३ रोजी खोपोली स्थानावर सत्संग शिबीर संपन्न झाले. 'नवरत्नमाला स्तोत्र' यावर प.पू.श्रीसद्गुरूंची विवेचने झाली.

"श्रीगंगा परिक्रमा २०१२" छायाचित्रांसाठी क्लिक करा

  संकेतस्थळ अतिथी


परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित "अघोरकष्टोधरण स्तोत्र" या स्तोत्र वरील आधारित "(A)ghorakashtoddhranana Stotra : The entire Substance and Interpretation" या इंग्रजीतील ग्रंथाचे विमोचन यज्ञनारायणच्या साक्षीने प पू श्री सद्गुरू बापट गुरुजींच्या हस्ते दिनांक २२ जून २०१४ रोजी बदलापूर येथे झाले.
"Shri Vasudev Yati - विमोचन सोहळा "

प पू स्वामी विराजानंद विरचित 'परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज' यांचे जीवन चरित्रावर आधारित "Shri Vasudev Yati" या इंग्रजी ग्रंथाचे विमोचन यज्ञनारायणच्या साक्षीने 'प पू श्री सद्गुरू बापट गुरुजींच्या' हस्ते दिनांक ८ जून रोजी बदलापूर येथे झाले.  पुढे वाचा...
"विचारें मना तूंचि शोधूनि पाहें"

"विचारें मना तूंचि शोधूनि पाहें" ह्या पुस्तकाचे विमोचन परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींच्या उपस्थितीत नुकतेच झाले.  पुढे वाचा...
"नमो गुरवे वासुदेवाय"

नमो गुरवे वासुदेवाय : मंत्र आणि यंत्र साधना ह्या पुस्तकाचे विमोचन परमपूज्य सद्‍गुरु श्री बापट गुरुजींच्या उपस्थितीत संतकृपा मासिकाचे संपादक डॉ. श्री भारवि खरे ह्यांच्या हस्ते नुकतेच दिनांक २२ जुलै २०१३ रोजी श्रीगुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर झाले.  पुढे वाचा...

  आगामी कार्यक्रम

(सूचना: प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या रविवारी बदलापूर येथे यज्ञ आयोजित केला जातो.)