* यज्ञ कार्यक्रम- सन २०१० ( यज्ञ क्र.२२५-२२९)
श्रीमहागणेश यज्ञ - यज्ञ क्र.२२९- गायत्री गार्डन, बदलापूर येथे दि.१४ फेब्रु.२०१० रविवार रोजी संपन्न झाला.
रुद्रस्वाहाकार - यज्ञ क्र.२२८- गायत्री गार्डन, बदलापूर येथे दि.१२ फेब्रु.२०१० (महाशिवरात्र) शुक्रवार रोजी संपन्न झाला.
श्रीगणेश यज्ञ - यज्ञ क्र.२२७- ओम सद्गुरू प्रतिष्ठान बोरीवली (मुंबई) येथे दि.२६ जाने.२०१० (गाणगापुर सप्ताह) मंगळवार रोजी संपन्न झाला.
नवचंडी स्वाहाकार -यज्ञ क्र.२२६- अहमदाबाद (गुजरात) येथे दि. १७ जाने.२०१० रोजी संपन्न झाला.
——————————————————————————–
श्रीविष्णु यज्ञ – यज्ञ क्र. २२५
श्रीविष्णु यज्ञ रविवार दि १० जानेवारी २०१० रोजी सकाळी ९.३० पासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ( षटतिला एकादशी ) गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला.श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. उपस्थित सुमारे ४०० साधकांनी श्री विष्णुसहस्त्रनामस्तोत्राची सामुदायिक पठण व हवन याची दिवसभरात ७ आवर्तने केली.
सकाळच्या सत्रात श्री गुरुजींनी श्रीविष्णु दैवताचे व्यापकत्व, एकादशी व्रत,उपवास शब्दाचा अध्यात्मात अभिप्रेत असलेला अर्थ, उपासना पद्धती,साधकांचे आचरण इ. विषयी विस्तृत मार्गदर्शनपर विवेचन केले. सायंकाळी श्रीगुरुजींनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज विरचित श्रीलक्ष्मीनारायण स्तोत्र यावर विवेचन केले. श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.