* यज्ञ कार्यक्रम -सन २००९ (यज्ञ क्र.२११ ते २२४)
वार्षिक यज्ञ सोहळा –यज्ञ क्र.२२४
परमपूज्य श्रीगुरुजींच्या आशीर्वादाने दि.१५ ते २१ डिसेंबर २००९ या सात दिवसांच्या कालावधीत ‘श्रीक्षेत्र पुष्कर’ (राजस्थान) येथे वार्षिक यज्ञ सोहळा संपन्न झाला.या यज्ञ सोहळ्यास सुमारे ३०० साधक उपस्थित होते. छायाचित्रांसाठी ‘पुष्कर यज्ञ सोहळ्याची छायाचित्रे’ हा विभाग बघावा. ( येथे वाचा : श्रीक्षेत्र पुष्कर यज्ञ सोहळ्याचे वृत्त )
—————————————————————————————————————————————————
महिम्नस्वाहाकार यज्ञ — यज्ञ क्र. २२३
महिम्नस्वाहाकार यज्ञ दिनांक १३ डिसेंबर २००९ रविवार सकाळी ९.३० पासून सायंकाळी ५वाजे पर्यंत सम्पन्न झाला.
श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने सकाळच्या सत्रात यज्ञ प्रज्वलन झाले. त्यानंतर श्रीशिवमहिम्नस्तोत्राचे सामुदायिक पठण व हवन झाले. श्रीशिवमानसपूजा झाल्यावर श्रीगुरुजींनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ‘अनादिकल्पेश्वरस्तोत्रम’ यावर विवेचन केले व या स्तोत्राचे उपस्थित ३०२ साधकांकडून सामुदायिक पठण करवून घेतले.
श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशीर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
———————————————————————————————————————————–
गायत्री यज्ञ — यज्ञ क्र.२२२;
गायत्री यज्ञ रविवार दि ८ नोव्हेंबर २००९ रोजी सकाळी ९.३० पासून सायंकाळी ५.१५ वाजेर्यंत गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला.श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. श्रीगुरुजींनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् चिदम्बर दीक्षित स्वामी महाराज यांच्या जयंति निमित्ताने त्यांच्या अलौकिक जीवन चरित्रावर विवेचन केले. प.प. श्रीमद् दीक्षित स्वामी महाराज यांचे जीवन म्हणजे उत्तम प्रपंच आणि उत्कृष्ट अध्यात्म यांचा मेळ होता. श्रीगुरुजींनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ‘चिदंबरदीक्षित स्तोत्र’ व ‘चिदंबरस्तुति स्तोत्र’ यावर विवेचन केले.सायंकाळच्या सत्रात उपस्थित सर्वांनी आचार्य शंकर विरचित ‘कालभैरवाष्टकम् स्तोत्राचे’ पठण केले.
उपस्थित सुमारे ३०९ साधकांनी श्री सूक्त व गायत्री मंत्रांचे सामुदायिक पठण याची दिवसभरात आवर्तने केली व हविर्भाग अर्पण केले. श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली. (वाचा:यज्ञ क्र.२१७ मधील ‘गायत्री मंत्र’ यावरील माहिती).
———————————————————————————————————————————————————-
गायत्री यज्ञ — यज्ञ क्र.२२१;
गायत्री यज्ञ रविवार दि ११ऑक्टोबर २००९ रोजी सकाळी ९.३० पासून सायंकाळी ५.१५ वाजेर्यंत गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला.श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. श्रीगुरुजींनी ‘गायत्री यज्ञ’ या विषयावर विवेचन केले.यावेळी श्रीगुरूजींनी असे सांगितले की,विश्वाची निर्मिती वैश्विक शक्तिच्या नादामधून झाली आहे. आता या मानवी जन्मामधे वैश्विक शक्तिपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे मुक्ती मिळविण्यासाठी, तेवढीच प्रभावी नादशक्ति असलेल्या गायत्री मंत्राचे पठण आवश्यक आहे असे श्रीगुरुजींनी सांगितले. उपस्थित सुमारे ३४० साधकांनी गायत्री मंत्राचे सामुदायिक पठण याची दिवसभरात ७ आवर्तने केली व हविर्भाग अर्पण केले. सायंकाळच्या सत्रात श्रीगुरुजींनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ‘तुळजापुरवासिनी स्तोत्र‘ यावर विवेचन केले.श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली. (वाचा:यज्ञ क्र.२१७ मधील ‘गायत्री मंत्र’ यावरील माहिती).
——————————————————————————————————————————————————–
पितृयज्ञ -यज्ञ क्र.२२०
पितृयज्ञ रविवार दि १३ सप्टेंबर 200९ रोजी (महालय) सकाळी ९.३० पासून सायंकाळी ५.१५ वाजेर्यंत गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला.श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. उपस्थित सुमारे ५४० साधकांनी गायत्री मंत्राचे सामुदायिक पठण व हवन याची दिवसभरात ९ आवर्तने केली व पितरांना हविर्भाग अर्पण केले. श्रीगुरुजींनी पितृयज्ञ या विषयावर विवेचन केले.यावेळी श्रीगुरूजींनी मानवी जन्म, पुनर्जन्म, पितर, पितरांविषयी कृतज्ञता या संकल्पना विज्ञान व अध्यात्म या आधारे स्पष्ट केल्या. उपस्थित साधकांनी सुमारे ६७.५लक्ष गायत्री मंत्र पुढील ९० दिवसांमधे जप करण्याचा संकल्प केला व ही मंत्र संख्या यज्ञ साक्षीने पितरांस अर्पण केली. श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली. (पुढे वाचा: ‘स्मरण पूर्वजांचे’,प.पू.श्री गुरुजींचा रविवार दि.१३ सप्टेंबर २००९ च्या दैनिक ‘सामना’ मधील लेख).
_____________________________________________________________________________________________
श्रीगणेश यज्ञ -यज्ञ क्र.२१९
श्रीगणेश यज्ञ रविवार दि 9 ऑगस्ट 2009 रोजी ( संकष्टी चतुर्थी ) सकाळी 9:30 पासून सायंकाळी 5 वाजेर्यंत गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला.श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. उपस्थित सुमारे 325 साधकांनी श्रीगणेशअथर्वशीर्ष सामुदायिक पठण व हवन याची दिवसभरात 21 आवर्तने केली.श्रीगुरुजींनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ‘समंत्रकश्रीगणपतीस्तोत्रं’ यावर विवेचन केले.श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
————————————————————————————————————–
दत्तयज्ञ - यज्ञ क्र.२१८
रविवार दि.12 जुलै 2009 श्रीगुरुपौर्णिमा कार्यक्रम निमित्ताने दत्तयज्ञ संपन्न झाला. प.पू. श्रीगुरुजींच्या पवित्र मंत्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. श्रीगुरुजींनी श्रीरंगावधूत महाराज विरचित दत्तयाग मंत्रांनी हविर्भाग अर्पण करवून घेतले. सकाळच्या सत्रात नामगजर व त्यानंतर श्रीगुरुजींचे पाद्यपूजन संपन्न झाले. सायंकाळी श्रीगुरुजींनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी सद्गुरु श्रीमद् नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची ‘सद्गुरुतीर्थस्तोत्र’ या स्तोत्राने केलेल्या गुरुस्तुति यावर विवेचन केले.श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
—————————————————————————————————————
गायत्री यज्ञ - यज्ञ क्र. २१७
गायत्री यज्ञ रविवार दि 14 जून 2009 रोजी सकाळी 9:30 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला.श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. उपस्थित सुमारे 351 साधकांनी गायत्री मंत्राचे सामुदायिक पठण व हवन याची दिवसभरात आवर्तने केली.
प.पू. श्रीगुरुजींनी ‘गायत्री मंत्र व यज्ञ’ या विषयावर सकाळच्या सत्रात विवेचन केले. ऋग्वेद 3र्या मंडलातील 62व्या सूक्ताची 10वी ऋचा म्हणजे गायत्री मंत्र होय. हा मंत्र 24 अक्षराचा असून 24 ऋषींनी प्रत्येकी एक अक्षर याप्रमाणे या मंत्राची निर्मिती झाली.मूळ संस्कृत वाल्मिकी रामायणाच्या प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ गायत्री मंत्राच्या एकेका अक्षराने झालेला आहे.
श्रीगुरुजींनी गायत्री मंत्राचे विज्ञान विशद केले. गायत्री मंत्राच्या यज्ञसाक्षीने केलेल्या सामुदायिक पठणाने मोठया प्रमाणावर शक्तीची निर्मिती होते.
त्यानंतर, दुपारच्या सत्रात विद्यार्थी दत्तक योजनेच्या अंतर्गत सुमारे 150 विद्यार्थ्यांना (इयत्ता 10 वी पर्यंत) प.पू. श्रीगुरुजींच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
———————————————————————————————————–
श्रीविष्णु यज्ञ – यज्ञ क्र. २१६
श्रीविष्णु यज्ञ रविवार दि 10 मे 2009 रोजी सकाळी 9:30 पासून सायंकाळी 5 वाजे पर्यंत ( देवर्षि नारद जयंती ) गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला.श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. उपस्थित सुमारे 400 साधकांनी श्री विष्णुसहस्त्रनामस्तोत्राची सामुदायिक पठण व हवन याची दिवसभरात आवर्तने केली.
सकाळच्या सत्रात पद्मश्री एम्. रेहमान (निवृत्त आय.ए.एस्. अधिकारी) यांचा श्रीगुरुजींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री.एम्.रेहमान यांनी राष्ट्र-ऐक्यासाठी सर्वधर्मियांनी आपापल्या धर्माचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रत्येक धर्म हा मानवाला प्रेमाचीच शिकवण देतो असे श्री.रेहमान यांनी सांगितले. त्यांनी जम्मू-काश्मीर येथे सनदी सेवेत असतानाचे त्यांचे अनुभव सांगितले.
श्रीगुरुजींनी नारद जयंतीनिमित्त देवर्षि नारद यांच्यावरील विवेचनात देव तसेच दानव हे दोघेही नारदांवर विश्वास ठेवीत असल्याचे दाखले दिले व त्यामधून देवर्षिंचे महात्म्य स्पष्ट केले. सायंकाळी आचार्य शंकर रचित जगन्नाथाष्टकम स्तोत्र यावर श्रीगुरुजींचे विवेचन झाले. श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
—————————————————————————————————————————-
गणेश यज्ञ – यज्ञ क्र. २१५
श्रीगणेश यज्ञ रविवार दि 12 एप्रिल 2009 सकाळी 9:30 पासून सायंकाळी 5 वाजे पर्यंत (संकष्टी चतुर्थी) गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला. श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. उपस्थित सुमारे 346 साधकांनी श्रीगणेश अथर्वशीर्ष सामुदायिक पठण व हवन याची दिवसभरात 21 आवर्तने पूर्ण केली. श्रीगुरूजींनी विवेचनामधे संतसाहित्य व ‘गणेशपुराण’ यामध्ये असलेल्या ‘श्रीगणेश’ या देवतेच्या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या. श्रीगुरूजींनी समर्थ रामदासस्वामी, संत ज्ञानेश्वर यांनी केलेले गणेशाचे स्तवन व गणेश,गजानन,विनायक,महोत्कट या रूपांचे वर्णन सांगितले. सायंकाळी आचार्य शंकर रचित गणेशपञ्चरत्नस्तोत्र यावरील श्रीगुरुजींचे यापूर्वी झालेले विवेचन पुनःश्च श्रवण करण्याचा सर्वांना लाभ झाला. श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
————————————————————————————————-
श्रीरामरक्षा यज्ञ – यज्ञ क्र.२१४
श्रीरामरक्षा यज्ञ शुक्रवार ( श्रीराम नवमी ) दिनांक 3 एप्रिल 2009 , सकाळी 9:30 पासून सायंकाळी 5.15 वाजेपर्यंत गायत्री गार्डन, बदलापूर येथे सम्पन्न झाला. प.पू.श्रीगुरुजीनी केलेल्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. प.पू.श्रीगुरुजीनी आचार्य शंकर विरचित श्रीराम मानसपूजास्तोत्राने उपस्थित 359 साधकांकडून श्रीराम प्रतीकावर मानसपूजा करवून घेतली. प.पू.श्रीगुरुजीनी यज्ञ तपाच्या कार्यक्रमास 15वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यज्ञ साधनेचा आढावा घेतला. तसेच श्रीगुरुजीनी प्रभु श्रीरामचंद्रांच्या आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श राजा या अलौकिक गुणांचे स्मरण करवून देणारे विस्तृत विवेचन केले. सायंकाळी प.पू.श्रीगुरुजीनी यापूर्वी केलेल्या आचार्य शंकर विरचित श्रीरामस्तोत्र यावरील विवेचन पुनश्च श्रवण करण्याचा लाभ उपस्थितांना झाला. संपूर्ण यज्ञ कार्यक्रमात श्रीरामरक्षा पठण व हवन याची सामुदायिक 11 आवर्तने झाली. प.पू.श्रीगुरुजीनी केलेल्या पूर्णाहुती मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
———————————————————————————————–
रुद्रस्वाहाकार यज्ञ – यज्ञ क्र. २१३
रुद्रस्वाहाकार यज्ञ दिनांक 12 मार्च 2009 गुरुवार (संत तुकाराम महाराज बीज) रोजी ओम सद्गुरू प्रतिष्ठान, बोरिवली येथे सम्पन्न झाला. या तिथीला प.पू. श्री. भाऊमहाराज करंदीकर व प.पू. श्री. साटम महाराज या सत्पुरुषांची पुण्यतिथी होती. सायंकाळी 5 वा. पर्यंत सामुदायिक रुद्र पठण व हवन झाले. त्यानंतर प.पू. श्रीगुरूजींनी श्री. साटम महाराज यांचे जीवनचरित्रावर विवेचन केले.
————————————————————————————————-
महिम्नस्वाहाकार यज्ञ — यज्ञ क्र. २१२
महिम्नस्वाहाकार यज्ञ दिनांक 8 मार्च 2009 रविवार सकाळी 9:30 पासून सायंकाळी 5 वाजे पर्यंत सम्पन्न झाला.
श्रीगुरुजींच्या मन्त्रोच्चारणाने सकाळच्या सत्रात यज्ञ प्रज्वलन झाले. त्यानंतर श्रीशिवमहिम्नस्तोत्राचे सामुदायिक पठण व हवन झाले. श्रीशिवमानसपूजा झाल्यावर श्रीगुरूजींनी ‘श्रीशिवमहिम्नस्तोत्र’ यावर विवेचन केले. श्रीगुरूजींनी सांगितले की, प्रत्येक मनुष्यात शिवशक्ति आहे तोपर्यंत तो शिव आहे परंतु त्याची जाणीव आपल्याला नसते. शिवशक्ति शरीर सोडून गेल्यावर केवळ शव शिल्लक राहते.या शिवाची जाणीव होण्यासाठी शिवशक्तीची आराधना करावयास पाहीजे. पुष्पदन्त गंधर्वाने ‘श्रीशिवमहिम्नस्तोत्र’ या श्रेष्ठ भक्तिपर स्तोत्राने शिवस्तुति केली व त्यास देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले अशी कथा आहे. श्रीगुरूजींनी श्रीशिवमहिम्नस्तोत्राच्या श्लोकांमधील काव्य व भक्ति यावर विस्तृत भाष्य केले.
श्रीगुरूजींनी सायंकाळच्या सत्रात आचार्य शंकर विरचित द्वादशज्योतीर्लिंगस्तोत्रावर विवेचन केले व या स्तोत्राचे उपस्थित 325 साधकांकडून सामुदायिक पठण करवून घेतले.श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशीर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
————————————————————————————————-
रुद्रस्वाहाकार यज्ञ – यज्ञ क्र. २११
रुद्रस्वाहाकार यज्ञ सोमवार दिनांक 23फेब्रुवारी 2009 रोजी संपन्न झाला.
प.पू. श्रीगुरूजींनी दि 23 फेब्रु 2009 (महाशिवरात्र) च्या ‘रुद्रस्वाहाकार यज्ञ’ प्रसंगी उपस्थित सुमारे 355 साधकांना मार्गदर्शनपर विवेचन केले. श्रीगुरूजींनी शिव, महादेव, रुद्र या शक्तीच्या संकल्पना व रुद्राध्यायाचे महत्व विस्तृतपणे विषद करून सांगितले.
प्रत्येक मानवात शिवशक्ती आहे व ही सुप्त शिवशक्ती जागृत होण्यासाठी श्रीगुरूजींनी गणितीय सूत्र सांगितले. ते असे की “आनंद = लाभ ÷ तृष्णा“. सर्व प्रकारच्या तृष्णा, म्हणजे इच्छा, प्रत्येकाने शून्यावर आणल्या तर आनंद Infinite म्हणजे अगणित होतो. तृष्णा नसणे म्हणजे वैराग्य होय. देवाधिदेव महादेव वैराग्याचे मूर्तिमन्त प्रतिक आहे. इच्छात्यागाशिवाय शिवप्राप्ती होत नसल्याने त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे श्रीगुरूजींनी सांगितले.
सायंकाळी आचार्य शंकर विरचित ‘ वेदसारशिव स्तोत्र‘ यावरील श्रीगुरुजींचे यापूर्वी झालेले विवेचन पुनश्च श्रवण करण्याचा लाभ उपस्थित सर्वांना झाला. श्री गुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशीर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.
——————————————————————————————————–
