यज्ञ एक वरदान Print E-mail

Yadnyaयज्ञ ही एक सर्वश्रेष्ठ सामूहिक साधना आहे. सद्हेतूने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ होय व प्रकाश म्हणजे गती होय. यज्ञामध्ये प्रज्वलित केलेल्या पवित्र अग्निच्या प्रकाशावरील एकाग्रतेसहित केलेल्या सामुदायिक मंत्र पठणाने मंत्रशक्तिचा प्रचंड गुणाकार होतो व त्याचा लाभ स्वशक्तिपुनर्मेळ (Bio-feedback) पद्धतीने व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांना होतो.वैदिक यज्ञ हा आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांतांद्वारे श्रीगुरुजींनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी सामाजिक सहभागासहित सुरू केला आहे. यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, पितृयज्ञ इ. चा समावेश आहे.

पुढे वाचा...
 
यज्ञ परिचय
"आमंत्रण सर्वांना, आग्रह कोणालाही नाही." सर्व जातींचे-पंथांचे-धर्मांचे स्त्री, पुरुष, कोणत्याही व्यक्तीला या यज्ञ कार्यक्रमात सहभागी होण्याची व मंत्र पठण-हवन करण्याची मुभा आहे; कारण प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा खराखुरा उद्धार करवून घेण्याचा हक्क निसर्गाने दिला आहे. - परमपूज्य सदगुरू श्री.बापट गुरुजी
 
परमपूज्य सदगुरू श्री.बापट गुरुजींचा परिचय Print E-mail

Bapat Gurujiपरमपूज्य श्री.वासुदेव वामन बापट गुरुजी (Shri Vasudev Vaman Bapat Guruji) यांचा जन्म घनपाठी, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात २९ ऑगस्ट १९५३ रोजी झाला. त्यांच्या कुळात १० पिढ्या अग्निहोत्राची साधना होती. श्रीगुरुजींनी सतत १६ वर्षे गुरुचरित्राचे नियमीत वाचन व पारायणे, तसेच सतत ७ वर्षे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया केली आहे. सन १९८१ ते १९९३ या काळात त्यांनी स्वामी विज्ञानानंद ह्यांच्य़ा ज्ञानमार्गाचा अभ्यास केला आहे. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (Shri Vasudevanand Saraswati Swami Maharaj) व स्वामी विज्ञानानंद (Swami Vijnanananda) यांच्या प्रेरणेने श्रीगुरुजींनी १९९४ मधे जाहीरपणे सामुदायिक यज्ञांची सुरूवात केली व १०८ यज्ञांचा संकल्प केला. ६१ यज्ञांच्यानंतर प्रेरणा होऊन श्रीगुरुजींनी गायत्री यज्ञांची सुरूवात केली. ९० यज्ञांच्यानंतर श्रीगुरूजींना रुद्र स्वाहाकाराची प्रेरणा झाली. श्रीगुरूजींनी इ.स.२००० मधे कल्याण येथे प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र स्थापन केले. इ.स.२००२ मधे १०८ यज्ञ पूर्ण झाले, परंतु काही प्रेरणांमुळे यज्ञ चालू ठेवले.

पुढे वाचा...
 
प.पू.सदगुरू श्री.बापट गुरुजी लिखित साहित्य Print

Bapat Gurujiअघोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन : जीवन म्हणजे सततचा संघर्ष. आयुष्यात प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतंच असं नाही. कित्येकदा ठरवतो एक आणि होतं दुसरंच. तर कधी काही कल्पना नसताना समस्या उभ्या राहतात. काय करावं, सुचेनासं होतं. मन सैरभैर होतं आणि आधार शोधू लागतं. अशा वेळी निश्चित सुचवावसं वाटतं की, श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या या अघोरकष्टोद्धरणस्तोत्राचा आश्रय घ्यावा. पुढे वाचा...

Bapat Gurujiश्रीगुरुस्तुति – संपूर्ण अर्थ व विवेचन : अध्यात्मिक पायवाट चालू इच्छिणा-या सामान्य मनुष्याच्या मनात मुळातूनच एक गोंधळ असतो - 'सगुण कि निर्गुण ? द्वैत कि अद्वैत ?' भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञान निर्गुण तत्वाचा उपदेश करते, मात्र सदैव प्रतीतीस येते ते द्वैतात्मक सगुण विश्व. याच कारणामुळे मनुष्याच्या बुद्धीत विक्षेप निर्माण होतो.

पुढे वाचा...
 

  आगामी कार्यक्रम

यज्ञ क्र.२३९
दत्तयज्ञ (श्रीगुरुपौर्णिमा कार्यक्रम) - ८ ऑगस्ट २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व)
यज्ञ क्र.२४०
गायत्री यज्ञ - १२ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४१
गायत्री यज्ञ - १० ऑक्टोबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४२
शतचंडी स्वाहाकार - १४नोव्हेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४३
वार्षिक यज्ञ सोहळा - १ ते ७ डिसेंबर २०१०
स्थळ : श्रीक्षेत्र नैमिषारण्य

  संकेतस्थळ अतिथी

श्रद्धांजली : प.पू. बापट गुरुजींच्या मातोश्री प.पू.माईसाहेब यांनी मंगळवार दि.१८ ऑगस्ट २००९ रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी इहलोकीचा निरोप घेतला. माईसाहेब यांना सर्व साधक-शिष्य यांची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आहोत.