|
|||||||||||||||||
अनुक्रमणिका
विशेष कार्यक्रम
श्रीसद्गुरुंचे विवेचन :
• दि.५ फेब्रु.(सा.५.३०-६.३०), व
• दि.८ फेब्रु.(स.११-१२) होईल.
इतर तपशीलासाठी क्लिक करा...
श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
संकेतस्थळ अतिथी
परमपूज्य सद्गुरु श्री बापट गुरुजी यांच्या "श्रीदत्तात्रेयस्तोत्र" या नवीन ग्रंथाचा प्रकाशन सोहळा खोपोली येथे दिनांक १० डिसेंबर २०११ रोजी, दत्त जयंतीच्या मुहूर्तावर, नर्मदा परिक्रमेच्या अंतर्गत संपन्न झाला. पुढे वाचा...
आगामी कार्यक्रम
ताज्या घडामोडी
»दत्तमहात्म्यातील कैवल्य लेणे ("श्रीदत्तात्रेयस्तोत्र" परीक्षण, संतकृपा, फेब्रुवारी २०१२)»श्रीगुरुचरित्र - शोध आणि बोध (संतकृपा, फेब्रुवारी २०१२)
» 'यज्ञ रहस्य' पुस्तकाचे 'अक्कलकोट स्वामीदर्शन, जानेवारी १२' मधील परीक्षण
» 'राजस परिक्रमा' - अविनाश बिनीवाले, 'लोकप्रभा', २०/०१/१२
» 'यज्ञ रहस्य' पुस्तकाचे 'धर्मभास्कर, दिवाळी २०११' मधील परीक्षण
»निष्ठा आणि अनुभव (संतकृपा, जानेवारी २०१२)
»"श्रीदत्तात्रेयस्तोत्र" प्रकाशन सोहळा
»श्रीनर्मदा परिक्रमेची छायाचित्रे
»श्रीनर्मदा परिक्रमा वृत्त:सद्गुरुतीर्थ यात्रा
»प.पू.सदगुरू श्री.बापट गुरुजी लिखित साहित्य





यज्ञ ही एक सर्वश्रेष्ठ सामूहिक साधना आहे. सद्हेतूने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ होय व प्रकाश म्हणजे गती होय. यज्ञामध्ये प्रज्वलित केलेल्या पवित्र अग्निच्या प्रकाशावरील एकाग्रतेसहित केलेल्या सामुदायिक मंत्र पठणाने मंत्रशक्तिचा प्रचंड गुणाकार होतो व त्याचा लाभ स्वशक्तिपुनर्मेळ (Bio-feedback) पद्धतीने व्यक्ती, समाज, राष्ट्र या सर्वांना होतो.वैदिक यज्ञ हा आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांतांद्वारे श्रीगुरुजींनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी सामाजिक सहभागासहित सुरू केला आहे. यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार, पितृयज्ञ इ. चा समावेश आहे.
परमपूज्य श्री.वासुदेव वामन बापट गुरुजी (Shri Vasudev Vaman Bapat Guruji) यांचा जन्म घनपाठी, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात २९ ऑगस्ट १९५३ रोजी झाला. त्यांच्या कुळात १० पिढ्या अग्निहोत्राची साधना होती. श्रीगुरुजींनी सतत १६ वर्षे गुरुचरित्राचे नियमीत वाचन व पारायणे, तसेच सतत ७ वर्षे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया केली आहे. सन १९८१ ते १९९३ या काळात त्यांनी स्वामी विज्ञानानंद ह्यांच्य़ा ज्ञानमार्गाचा अभ्यास केला आहे. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (Shri Vasudevanand Saraswati Swami Maharaj) व स्वामी विज्ञानानंद (Swami Vijnanananda) यांच्या प्रेरणेने श्रीगुरुजींनी १९९४ मधे जाहीरपणे सामुदायिक यज्ञांची सुरूवात केली व १०८ यज्ञांचा संकल्प केला. ६१ यज्ञांच्यानंतर प्रेरणा होऊन श्रीगुरुजींनी गायत्री यज्ञांची सुरूवात केली. ९० यज्ञांच्यानंतर श्रीगुरूजींना रुद्र स्वाहाकाराची प्रेरणा झाली. श्रीगुरूजींनी इ.स.२००० मधे कल्याण येथे प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र स्थापन केले. इ.स.२००२ मधे १०८ यज्ञ पूर्ण झाले,परंतु काही प्रेरणांमुळे यज्ञ चालू ठेवले.श्री गुरुजींनी २००५ मधे सुरू केलेल्या सात दिवसांच्या यज्ञ कार्यक्रमांचे सात वर्षांचे चक्र नोव्हें.- डिसें.२०११ मधे झालेल्या नर्मदा परिक्रमेतील यज्ञ कार्यक्रमांत पूर्ण झाले आहे.



