परमपूज्य सदगुरू श्री.बापट गुरुजींचा परिचय Print E-mail

Bapat Gurujiपरमपूज्य श्री.वासुदेव वामन बापट गुरुजी (Shri Vasudev Vaman Bapat Guruji) यांचा जन्म घनपाठी, विद्वान दशग्रंथी ब्राह्मण कुळात २९ ऑगस्ट १९५३ रोजी झाला. त्यांच्या कुळात १० पिढ्या अग्निहोत्राची साधना होती. श्रीगुरुजींनी सतत १६ वर्षे गुरुचरित्राचे नियमीत वाचन व पारायणे, तसेच सतत ७ वर्षे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याची प्रक्रिया केली आहे. सन १९८१ ते १९९३ या काळात त्यांनी स्वामी विज्ञानानंद ह्यांच्य़ा ज्ञानमार्गाचा अभ्यास केला आहे. श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (Shri Vasudevanand Saraswati Swami Maharaj) व स्वामी विज्ञानानंद (Swami Vijnanananda) यांच्या प्रेरणेने श्रीगुरुजींनी १९९४ मधे जाहीरपणे सामुदायिक यज्ञांची सुरूवात केली व १०८ यज्ञांचा संकल्प केला. ६१ यज्ञांच्यानंतर प्रेरणा होऊन श्रीगुरुजींनी गायत्री यज्ञांची सुरूवात केली. ९० यज्ञांच्यानंतर श्रीगुरूजींना रुद्र स्वाहाकाराची प्रेरणा झाली. श्रीगुरूजींनी इ.स.२००० मधे कल्याण येथे प्रकाश ज्ञान शक्ती केंद्र स्थापन केले. इ.स.२००२ मधे १०८ यज्ञ पूर्ण झाले, परंतु काही प्रेरणांमुळे यज्ञ चालू ठेवले.



श्रीगुरुजींनी कल्याण,मुंबई,खोपोली,नागोठणे,भिवंडी,ठाणे,बदलापूर,निर्मळ(वसई),कोळीसरे(लक्ष्मी-केशव),गुहागर (व्याडेश्वर),हेदवी,वेळणेश्वर,गणपतीपुळे,अकलूज,जळगाव,मिरज,बडोदे,गरुडेश्वर,नृसिंहवाडी,गोवा,दिल्ली,हरिद्वार, चित्रकूट,नैमिषारण्य,पुष्कर,अम्बेजोगाई,केडगाव,अमदाबाद अशा भारतभर २३९ हून अधिक यज्ञ संपन्न केले आहेत. यामधे गणेश यज्ञ, गायत्री यज्ञ, रामरक्षा यज्ञ, विष्णु यज्ञ, रुद्र स्वाहाकार, दत्तयज्ञ, श्रीयज्ञ, शतचंडी स्वाहाकार, महिम्न स्वाहाकार,हरिहर यज्ञ,पितृयज्ञ इ. चा समावेश आहे. जुलै २००३ पासून बदलापूर येथे दर महिन्याच्या दुसर्‍या रविवारी यज्ञ आयोजित केला जातो.



श्रीगुरूजींनी ‘श्रेष्ठ मंत्रशक्ति’ या पुस्तकाद्वारे अथर्वशीर्ष, ब्रह्मणस्पतिसूक्त, श्रीसूक्त, देवीसूक्त, रुद्राध्याय, विष्णुसहस्रनाम, विष्णुसूक्त, रामरक्षास्तोत्र, पुरुषसूक्त, मंत्रात्मक श्लोक, (अ)घोरकष्टोद्धरणस्तोत्र इ. मंत्रांचे संकलन यज्ञसन्मुख पठणासाठी साधकांना उपलब्ध करून दिले आहे. तसेच परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या ‘(अ)घोरकष्टोद्धरणस्तोत्र’ यावरील श्रीगुरुजींच्या विवेचनांचे ‘(अ)घोरकष्टोद्धरणस्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन’ हे पुस्तक ‘ओम् सद्गुरू प्रतिष्ठान’ यांनी मराठी व गुजराती भाषांमधे प्रकाशित केले आहे. पुस्तक परिचय व परिक्षण येथे वाचा :-


परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या ‘श्रीगुरुस्तुति स्तोत्र‘ यावरील श्रीगुरुजींच्या विवेचनांचे ‘तो पूर्ण आनंद गुरू समर्थ – संपूर्ण अर्थ व विवेचन’ हा ग्रंथ ‘ओम् सद्गुरू प्रतिष्ठान’ यांनी प.पू.श्रीगुरुजींच्या पवित्र हस्ते २६ जानेवारी २०१० मध्ये प्रकाशित केला आहे. (डॉ.भारवि खरे यांनी केलेले ग्रंथ परिक्षण येथे वाचा - ‘पूर्ण आनंद गुरू समर्थ’चे दर्शन – श्रीगुरुस्तुति).

 

विशेष कार्यक्रम

बदलापूर येथे विशेष कार्यक्रम - दि.२९, ३० व ३१ ऑगस्ट २०१० - १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरु श्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.

आगामी कार्यक्रम

विशेष कार्यक्रम
१०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरुश्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.
दि.२९,३० व ३१ ऑगस्ट २०१० - रोज स.९.३० ते रात्रौ ८.३० वा.पर्यंत
स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड,बदलापूर (पूर्व).
विशेष सूचना : १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा कार्यक्रम रविवार दि.२९ऑगस्ट २०१० रोज़ी स.९.३० वा.सुरु होईल.
यज्ञ क्र.२४०
गणेश यज्ञ - १२ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४१
पितृयज्ञ -२६ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४२
गायत्री यज्ञ - १० ऑक्टोबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४३
शतचंडी स्वाहाकार - १४नोव्हेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४४
वार्षिक यज्ञ सोहळा - २ ते ८डिसेंबर २०१०
स्थळ : श्रीक्षेत्र नैमिषारण्य

  संकेतस्थळ अतिथी