अघोरकष्टोद्धरण स्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन Print E-mail
Bapat Gurujiजीवन म्हणजे सततचा संघर्ष. आयुष्यात प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळतंच असं नाही. कित्येकदा ठरवतो एक आणि होतं दुसरंच. तर कधी काही कल्पना नसताना समस्या उभ्या राहतात. काय करावं, सुचेनासं होतं. मन सैरभैर होतं आणि आधार शोधू लागतं. अशा वेळी निश्चित सुचवावसं वाटतं की, श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या या अघोरकष्टोद्धरणस्तोत्राचा आश्रय घ्यावा. या स्तोत्राच्या आवर्तनाने आत्मविश्वास निश्‍चितपणे वाढतो आणि संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपोआप मिळतं.

विश्वातील अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्ति आणि शक्ति यांच्या प्रेरणेनुसार या स्तोत्रावर, खोपोली येथील स्थानी मी विवेचन केलं होतं. या विवेचनांच्या आधारे ओम सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचे हक्क मी ओम सद्गुरू प्रतिष्ठानास देत आहे.



स्तोत्राचा मथितार्थ सहज आणि सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तो अर्थ समजून घेऊन जे पठण करतील, त्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जसा भाव तसा अनुभव, हा अध्यात्मातील नियम असल्याने, यश मिळेलच अशा सकारात्मक विचाराने या स्तोत्राचं पठण करावं. या स्तोत्राच्या सामर्थ्याचा अनुभव पिढयान् पिढया लोकांनी घेतला आहे. सर्व साधकांनीही आपल्या अनुभवाच्या कक्षेत या स्तोत्राचं सामर्थ्य आणावं, हीच माझी सदिच्छा आहे.

— बापट गुरुजी.



परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांच्या ‘अघोरकष्टोद्धरणस्तोत्र’ यावरील श्रीगुरुजींच्या विवेचनांचे ‘अघोरकष्टोद्धरणस्तोत्र – संपूर्ण अर्थ व विवेचन’ हे पुस्तक ‘ओम् सद्गुरू प्रतिष्ठान’ यांनी मराठी व गुजराती भाषांमधे प्रकाशित केले आहे. पुस्तक परिचय व परिक्षण येथे वाचा :-



सदर पुस्तक या विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे...
 

विशेष कार्यक्रम

बदलापूर येथे विशेष कार्यक्रम - दि.२९, ३० व ३१ ऑगस्ट २०१० - १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरु श्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.

आगामी कार्यक्रम

विशेष कार्यक्रम
१०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरुश्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.
दि.२९,३० व ३१ ऑगस्ट २०१० - रोज स.९.३० ते रात्रौ ८.३० वा.पर्यंत
स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड,बदलापूर (पूर्व).
विशेष सूचना : १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा कार्यक्रम रविवार दि.२९ऑगस्ट २०१० रोज़ी स.९.३० वा.सुरु होईल.
यज्ञ क्र.२४०
गणेश यज्ञ - १२ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४१
पितृयज्ञ -२६ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४२
गायत्री यज्ञ - १० ऑक्टोबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४३
शतचंडी स्वाहाकार - १४नोव्हेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४४
वार्षिक यज्ञ सोहळा - २ ते ८डिसेंबर २०१०
स्थळ : श्रीक्षेत्र नैमिषारण्य

  संकेतस्थळ अतिथी

श्रद्धांजली : प.पू. बापट गुरुजींच्या मातोश्री प.पू.माईसाहेब यांनी मंगळवार दि.१८ ऑगस्ट २००९ रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी इहलोकीचा निरोप घेतला. माईसाहेब यांना सर्व साधक-शिष्य यांची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आहोत.वर्षश्राद्ध सोमवार दि.६ सप्टेंबर २०१० रोजी आहे.