Print E-mail
यज्ञ कार्यक्रम- सन २०१० (यज्ञ क्र.२२५-२३९)
श्रीदत्त यज्ञ- यज्ञ क्र.२३९- दि ८ ऑगस्ट २०१०,रविवार रोजी गायत्री गार्डन, बदलापूर येथे आयोजित दत्तयागाच्या निमित्ताने गुरुपौर्णिमा तसेच गुरूपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्ण शरणागत होऊन सद्‍गुरुतत्त्वाप्रीत्यर्थ भक्ती व श्रद्धायुक्त कृतज्ञता अर्पण करण्याचा दिवस म्हणजे व्यासपौर्णिमा अर्थात गुरूपौर्णिमा होय. या दिवशी पूर्ण आनंद आणि समर्थ स्वरूप असलेलं सद्‍गुरुतत्त्व सगुण देहातल्या सद्‍गुरूंच्या माध्यमातून अवतीर्ण होत असतं. या दिवसाला अनुरूप अशी स्फूर्तीदायक वातावरण निर्मिती या निमित्ताने बदलापूर स्थानावर करण्यात आली होती. यज्ञ प्रज्वलनापूर्वी म्हणल्या जाणाऱ्या सामुहिक प्रार्थनेला केंद्रभूत ठेवून उभा केलेला भव्य फलक उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. समाज आणि राष्ट्रोद्धारासाठी ज्या व्यक्तींनी आणि शक्तींनी अखंड प्रयत्न केले त्या सगळ्या संतजनांच्या आणि राष्ट्रपुरुषांच्या कृतज्ञतापूर्वक स्मरणाकरिता आद्य शंकराचार्य, स्वामी विद्यारण्य,स्वामी समर्थ,समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर,संत कबीर,संत गुरुनानक, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके,लोकमान्य टिळक,स्वातंत्र्यवीर सावरकर, इ. प्रातिनिधिक प्रतीके फलकावरती साकारण्यात आली होती. यज्ञ प्रज्वलन झाल्यानंतर उपस्थित असलेल्या सुमारे ४१५ भक्तांकडून परम पूज्य श्री. गुरुजींनी श्रीदत्तात्रेय नामावली तसेच (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे सामुहिक पठण तसेच हवन करून घेतले. यानंतर सद्‍गुरूपूजनाचा अनुपम सुंदर असा सोहळा संपन्न झाला. रुद्रमंत्रांच्या सामुहिक पठणानंतर टाळ-मृदुंगाच्या तालावर भावपूर्ण आरती करून सद्‍गुरू पूजनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. दुपारच्या सत्रांतल्या गुरुस्तुतीच्या कार्यक्रमात दोन भक्तांनी प्रातिनिधिक स्वरूपात स्वतःचे आत्मनिवेदन सद्‍गुरूंना सादर केले. त्यानंतर प.प. श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित श्रीदत्तगुरुपंचकम या शिखरणी वृत्तातल्या अत्यंत सुमधूर स्तोत्राचे सामुहिक पठण उपस्थित सर्व भक्तांकडून श्रीगुरुजींनी करून घेतले आणि पूर्णाहुतीच्या व आशीर्वादाच्या मंत्रांनी यज्ञाची सांगता करण्यात आली. उपस्थित सर्व भक्तांना कायम संस्मरणीय ठरावा असाच हा यज्ञ सोहळा होता हे निश्चित!

गायत्री यज्ञ – यज्ञ क्र.२३८ - गायत्री गार्डन, बदलापूर येथे दि.११ जुलै २०१०, ज्येष्ठ अमावस्या,रविवार रोजी संपन्न झाला.या गायत्री यज्ञामध्ये परम पूज्य सद्‍गुरु श्री. बापट गुरुजी यांनी अंधार आणि प्रकाश,महर्षि पतंजलींचे 'विशोकाना ज्योतीष्मती' हे योगसूत्र या विषयावर विवेचन केले. आत्म्याच्या दृष्टीने अज्ञान म्हणजेच अंधार. हा अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाच्या मार्गावर वाटचाल करण्याचा संकल्प केला पाहिजे. प्रकाशावर एकाग्रता साधण्यासाठी शोकरहित अशी मनाची अवस्था लागते. मानवी मनात शोकाची उत्पत्ती कॊणकोणत्या कारणांमुळे होते आणि त्यावर उपाय काय याचा सखोल परामर्श सद्‍गुरुंनी विवेचनात घेतला. दुपारच्या सत्रात पंचायतन महात्म्यानि या मधले ।। सूर्यस्य ।। या प.प. श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी रचलेल्या स्तोत्राचे सार्थ विवरण करून सामुहिक पठण श्री.गुरुजींनी भक्तांकडून करून घेतले. दिवसभरात उपस्थित सुमारे ३१५ भक्तांनी गायत्री मंत्राचे सामुदायिक पठण व हवन केले.

गायत्री यज्ञ – यज्ञ क्र.२३७ - गायत्री गार्डन, बदलापूर येथे दि.१३ जून २०१०,ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा,रविवार रोजी संपन्न झाला. या प्रसंगी परमपूज्य सद‍गुरू श्री. बापट गुरुजींनी गंगादशहरा प्रारंभाच्या निमित्ताने गंगादशहरा आणि गंगेची महती या विषयावर विवेचन केले. पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियांच्या माध्यमातून उत्पन्न होणाऱ्या दहा प्रकारच्या पापांचे आणि अहंकाराचे हरण करणारा तो गंगा दशहरा! भगवती गंगेच्या तीर्थात अहंकाराच्या विसर्जनाचे आणि पापक्षालनाचे सामर्थ्य असल्यानेच गंगेला अत्युच्च स्थान भारतीय आध्यात्माने दिले आहे. पूज्य श्रीगुरुजींनी श्रीगंगास्तोत्रम् या श्रीमद्‍ आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या स्तोत्राचे सामुहिक पठण आणि अर्थाचे विवरण घेतले. या प्रसंगी पूज्य श्री गुरुजींनी उपस्थित सर्व भक्तांकडून गंगेच्या आराधनेप्रीत्यर्थ निर्माण झालेल्या शाबरी मंत्रांचे पठण यज्ञ सन्मुख करून घेतले. ॐ नमः शिवायै नारायण्यै, दशहरायै गंगायै स्वाहा ।। ॐ नमो भगवति ऐं -हीं श्रीं हिलि हिलि मिलि मिलि गंगे मां, पावय पावय स्वाहा ।। दुसर्‍या सत्रात विद्यार्थी सहाय्यता उपक्रमा अंतर्गत पूज्य श्री गुरुजींनी पूज्य श्री गुरुजींनी बदलापूर परिसरातील इयत्ता १ली ते १० च्या १२५ विद्यार्थ्यांना सलग ४थ्या वर्षी शालेय साहित्याचे वाटप केले.दिवसभरात उपस्थित सुमारे ४०० भक्तांनी गायत्री मंत्राचे सामुदायिक पठण व हवन केले.

विष्णुयज्ञ – यज्ञ क्र.२३६ - गायत्री गार्डन, बदलापूर येथे ९ मे २०१०, रविवार रोजी संपन्न झाला.

महिम्न स्वाहाकार - यज्ञ क्र.२३५ - गायत्री गार्डन, बदलापूर येथे ११ एप्रील २०१०, रविवार रोजी संपन्न झाला.

रुद्रस्वाहाकार - यज्ञ क्र.२३४ - २ एप्रिल २०१० शुक्रवार रोजी ओम सद्गुरू प्रतिष्ठान नागोठणे येथे संपन्न झाला.

रामरक्षा यज्ञ - यज्ञ क्र.२३३ - गायत्री गार्डन, बदलापूर येथे २४ मार्च २०१० बुधवार (श्रीराम नवमी) रोजी संपन्न झाला.

शतचंडी स्वाहाकार - यज्ञ क्र.२३२ - गायत्री गार्डन, बदलापूर येथे दि.१४ मार्च २०१० रविवार रोजी संपन्न झाला.

शतचंडी स्वाहाकार - यज्ञ क्र.२३१ - दि. २ मार्च२०१० मंगळवार (प.पु.श्री भाऊ महाराज व साटम महाराज पुण्यतिथी, तुकाराम बीज) रोजी ओम सद्गुरू प्रतिष्ठान बोरीवली (मुंबई) येथे सकाळी १० वा.पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपन्न झाला.

रुद्रस्वाहाकार व पितृयज्ञ – यज्ञ क्र.२३० – श्रीक्षेत्र न्रुसिंहवाडी येथे रविवार दि.२१ फेब्रु.२०१० रोजी संपन्न झाला.

श्रीमहागणेश यज्ञ - यज्ञ क्र.२२९ - गायत्री गार्डन, बदलापूर येथे दि.१४ फेब्रु.२०१० रविवार रोजी संपन्न झाला.

रुद्रस्वाहाकार - यज्ञ क्र.२२८ - गायत्री गार्डन, बदलापूर येथे दि.१२ फेब्रु.२०१० (महाशिवरात्र) शुक्रवार रोजी संपन्न झाला.

श्रीगणेश यज्ञ - यज्ञ क्र.२२७ - ओम सद्गुरू प्रतिष्ठान बोरीवली (मुंबई) येथे दि.२६ जाने.२०१० (गाणगापुर सप्ताह) मंगळवार रोजी संपन्न झाला.

नवचंडी स्वाहाकार - यज्ञ क्र.२२६ - अहमदाबाद (गुजरात) येथे दि. १७ जाने.२०१० रोजी संपन्न झाला.


श्रीविष्णु यज्ञ – यज्ञ क्र. २२५

श्रीविष्णु यज्ञ - रविवार दि १० जानेवारी २०१० रोजी सकाळी ९.३० पासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत (षटतिला एकादशी) गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व) येथे संपन्न झाला.श्रीगुरुजींच्या पवित्र मन्त्रोच्चारणाने यज्ञ प्रज्वलन झाले. उपस्थित सुमारे ४०० साधकांनी श्री विष्णुसहस्त्रनामस्तोत्राची सामुदायिक पठण व हवन याची दिवसभरात ७ आवर्तने केली.

सकाळच्या सत्रात श्री गुरुजींनी श्रीविष्णु दैवताचे व्यापकत्व, एकादशी व्रत,उपवास शब्दाचा अध्यात्मात अभिप्रेत असलेला अर्थ, उपासना पद्धती,साधकांचे आचरण इ. विषयी विस्तृत मार्गदर्शनपर विवेचन केले. सायंकाळी श्रीगुरुजींनी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज विरचित श्रीलक्ष्मीनारायण स्तोत्र यावर विवेचन केले. श्रीगुरूजींनी केलेल्या पूर्णाहुती व आशिर्वाद मंत्रांनी यज्ञ सांगता झाली.



 

विशेष कार्यक्रम

बदलापूर येथे विशेष कार्यक्रम - दि.२९, ३० व ३१ ऑगस्ट २०१० - १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरु श्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.

आगामी कार्यक्रम

विशेष कार्यक्रम
१०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा, प.पू. सदगुरुश्री.बापट गुरुजी यांची 'दत्तात्रेयस्तोत्र' यावरील विवेचने, लक्षार्चना व तीन दिवसीय नामजप कार्यक्रम.
दि.२९,३० व ३१ ऑगस्ट २०१० - रोज स.९.३० ते रात्रौ ८.३० वा.पर्यंत
स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड,बदलापूर (पूर्व).
विशेष सूचना : १०८ सामुदायिक सत्यदत्तपुजा कार्यक्रम रविवार दि.२९ऑगस्ट २०१० रोज़ी स.९.३० वा.सुरु होईल.
यज्ञ क्र.२४०
गणेश यज्ञ - १२ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४१
पितृयज्ञ -२६ सप्टेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५. स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४२
गायत्री यज्ञ - १० ऑक्टोबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४३
शतचंडी स्वाहाकार - १४नोव्हेंबर २०१० (रविवार)
(सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ स्थळ : गायत्री गार्डन, कात्रप रोड, बदलापूर (पूर्व))
यज्ञ क्र.२४४
वार्षिक यज्ञ सोहळा - २ ते ८डिसेंबर २०१०
स्थळ : श्रीक्षेत्र नैमिषारण्य

  संकेतस्थळ अतिथी

श्रद्धांजली : प.पू. बापट गुरुजींच्या मातोश्री प.पू.माईसाहेब यांनी मंगळवार दि.१८ ऑगस्ट २००९ रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी इहलोकीचा निरोप घेतला. माईसाहेब यांना सर्व साधक-शिष्य यांची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित आहोत.वर्षश्राद्ध सोमवार दि.६ सप्टेंबर २०१० रोजी आहे.