"वासुदेव उवाच"
"जळातला मासा जसा आपल्या जीवनाला आधार देणारं हे पाणीच आहे हे जाणत नाही, तसंच आपले सर्व व्यवहार हे देहातील चैतन्याद्वारे चालू आहेत, हे आपण सहसा जाणत नाही."
भारतीय तत्त्वज्ञानाने सांगितलेला पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी हा फार मोठा सिद्धांत आहे. ब्रह्मांडात जशी २७ नक्षत्रे आहेत तसेच चित्ताचे २७ दोष आहेत. मनुष्याला आत्मज्ञान होण्यासाठी चित्ताच्या शुद्धीची आवश्यकता असते. ब्रह्मांडातली परमेश्वरी शक्ती मनुष्याला त्याच्या चित्तात प्रकटवता यावी, यासाठी जे जे काही आचरण मानवाकडून अपेक्षित आहे, ते ते सर्व स्वामी महाराजांनी चित्तसद्बोधनक्षत्रमाला ह्या सत्तावीस श्लोकांमध्ये समाविष्ट केले आहे.
       – प. पू. सद्गुरु श्री बापट गुरुजी

आपण खरंच कसे वागतो आहोत, काय करतो आहोत ह्याविषयी आत्मशोधन करण्याकडे समाजाला प्रवृत्त करावं, हेच ह्या स्तोत्र रचने मागचं मुख्य कारण आहे. आपल्या चुका जर आपल्याला वेळीच समजल्या तर आपण त्यात निश्चित सुधारणा करू शकतो. सामान्य मनुष्य ज्यात हमखास अडकतो, तो अहंकार हा चित्ताचा प्रमुख दोष काढून टाकण्याचा खोलवर विचार स्वामी महाराजांनी ह्या स्तोत्रात मांडला आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या अंतःकरण चतुष्टयामधले दोष साधकाने कसे कमी करावेत ह्या अतिशय उत्तम विवरण ग्रंथात केलं आहे.

Online पुस्तक विकत घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या link वरती click करावे
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Bapat%20Guruji&BookType=1